पोस्ट्स

जागरण

          # मनभेद होऊ न देता प्रवृत्तीविरुद् लढा देणारे 'जागरण'           ज्येष्ठ लेखक भारत सातपुते यांचे 'जागरण' हे कादंबरीवजा आत्मचरित्र वाचताना अंगावर शहारे येतात...एक सामान्य जागरण करून उपजिविका करणाऱ्या गोंधळी समाजात ,शेतमजूर व पुढे शाळासेवक झालेल्या भऊ यांचा एक सामान्य मुलगा आपल्या कर्तृत्वाने असामान्य पदाला जाऊन पोहोचतो. स्वतःसाठी जगायचं ठरवलं असतं तर भारत सातपुते या लेखकाने,शिक्षक व आदर्श मुख्याध्यापकाने  खोऱ्याने पैसा ओढला असता. परंतु स्वतःसाठी न जगता लेखक सदैव कुटूंबासाठी,समाजासाठी व विद्यार्थ्यांसाठी जगले. आयुष्यभर व्यसने,भ्रष्टाचार व काॅपी किंवा समाजातील वाईट प्रवृत्तीविरूदध लढले.अक्षरक्षः जागरण केलं.            घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी देवापुढे जागरण-गोंधळ घालतात. तसंच लेखक भारत सातपुते यांनी समाजाच्या सुख-समाधान व विकासासाठी सदमार्गाचं जागरण घातलं. स्वतःचा विचार न करता सतत समाजासाठी जगले. तेवत राहिले.जागरण करत राहिले. त्यांचं आत्मचरित्र वाचल्यावर लक्षात येतं ' स्वतःसाठी जगलास त...

एक भाकर तीन चुली...

          पारूबाई या अनाथांची माय सिंधुताई सपकाळच आहेत की काय असाच क्षणभर भास होतो ही कादंबरी वाचताना...         भरउन्हात खळ्यावर जन्माला आलेली अभागी पारूबाई आणि रात्रीच्या काळोखात चिमणीचा  उजेडही सोबतीला नसताना जन्माला आलेला बबू यांचा जीवनपट मनाला स्पर्शून जातो.आणि मनात घर करतो.          जन्म जिथे झाला ते खळं आणि आयुष्यभर कामं केलेली शेतं, नाला - बंडिगची कामं,ताली,रानं,यांनी पारूबाईची साथ कधी सोडलीच नाही. जीवनातील सर्व संकंट,रागराग,द्वेष,गरीबी,दुबळवाडी, भाऊबंदकी,पुरूषांच्या वखवखलेल्या नजरा,सासू - नणंदाचा छळ सहन करूनही पारूबाई कधीही जीवनाला वैतागत नाहीत.  संकटांना पायाखाली घेऊन  ,संकटाच्या छाताडावर उभं राहून पारूबाई स्वाभिमानानं जगतच राहातात. जीवनात हारत नाही. संकटांनी कधीही गर्भगळित होत नाहीत. ही कादंबरी वाचणारा वाचक जीवनातील संकटांना कधीच घाबरणार नाही. त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार कधीही येणार नाही. स्वाभिमानाने  जीवन जगण्याची प्रत्येकात ओढ निर्माण होईन.         ...

असे शिक्षक होणे नाही..

  पाबळच्या ज्ञानपंढरीचे  - पांडूरंग- दैवत.                   ज्यांनी आम्हांला घडवलं त्या श्री. भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ या शाळेतील अनेक गुरूजनांपैकी एक असणारे ,आमच्या शाळेचे माजी प्राचार्य मा.गाडीलकर सर .          आदरणीय गाडीलकर सर आणि त्या काळातील आमच्या शाळेतील शिक्षक हे केवळ शाळेपुरते शिक्षक नव्हते, तर  तेव्हाचे शिक्षक हे संपूर्ण गावाचे शिक्षक असायचे.गाडीलकर सर हे सुद्धा त्यातलेच एक. आमच्या श्री.भैरवनाथ विद्यामंदिर पाबळच्या ज्ञानपंढरीचे ते पांडूरंगच.        गाडीलकर सर हे आमच्या दोन पिढ्यांचे शिक्षक...माझ्या वडिलांना,आत्या व चुलते यांनाही ते शिकवायला होते. मी आणि माझ्या भावंडानाही ते शिकवायला होते. सरांच्या बाबतीत आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे सरांचा दरारा आणि शिस्त. पाबळची संपूर्ण शाळा जर कोणाला घाबरत असेल तर ती गाडीलकर सरांनाच. गाडीलकर सर हे नाव उच्चारताच किंवा त्यांना लांबून पाहिले तरी पोटात भितीचा गोळा यायचा. इतके सर कडक शिस्तीचे होते. केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांतही सरांच...

चूक नव्हे,शिक्षण..

        माझ्या वाचकमित्रांनो!      " चुका आणि शिका " ही अनुभवपद्धती आपण नेहमीच ऐकतो. चुका होत नाही असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही.चुका या काम करणार-यांकडूनच होतात. काही माणसं चुकांकडे दुर्लक्ष करतात.तर काही माणसं चुकांमधून शिकतात. चुकतो तो माणूस. आणि चुकांमधून शिकतो तो शहाणा माणूस.         चूक करणं हा मानवी गुणधर्म आहे.आणि झालेली चूक सुधारणे हे चांगला माणूस असण्याचं लक्षण आहे.झालेली चूक मान्य केली किंवा स्वीकारली की ती सुधारता येते.परंतु काही माणसं चुका स्वीकारत नाहीत. मी चुकू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीत. किंवा काहींना चुका स्वीकारण्याचा कमीपणा वाटतो. आणि अशी माणसं कधीही सुधारू शकत नाहीत. म्हणून चूक झाली तर मोठ्या मनाने चूक मान्य करा व सुधारणा करा.       बरेच जण चूक होऊ नये म्हणून कोणतंही काम करत नाहीत. काम टाळतात. आणि त्यामुळे चुकाच होत नाही. परंतु काम न करणाऱ्या माणसांना कोणताही अनुभव येत नाही. ते निष्क्रिय राहतात. याउलट काम करणारी माणसं चुकतात आणि अनुभवाने शहाणी होतात. चुकांमधून सुधारणा करतात. व ...

सकारात्मक विचार..

  माझ्या वाचक मित्रांनो!        ज्याप्रमाणे अस्वच्छ परिसर आणि अस्वच्छ वातावरणामुळे आपल्या शरीरावर परीणाम होतो. आपण आजारी पडतो, आपले शारीरिक स्वास्थ्य बिघडते. त्याप्रमाणे नकारात्मक विचार व नकारात्मक विचार करणारे लोक यांच्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते. आपण मनाने व विचाराने आजारी पडू शकतो. आजारी पडू नये म्हणून आपण स्वच्छ वातावरणात राहण्याचा व स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतो.तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी सकारात्मक विचार व सभोवताली सकारात्मक वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते.          जीवनात सकारात्मक विचार अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण सकारात्मक विचार केला तर घडणाऱ्या गोष्टीही चांगल्या घडतात. आपण जर नकारात्मक विचार केला तर घडणाऱ्या घटनाही वाईटच असतात.सकारात्मक विचार आपला जीवनदृष्टीकोन बदलतो.सकारात्मक विचार ही एक मानसिक व भावनिक वृत्ती आहे.सकारात्मक विचारांमुळे अनुकूल बदल घडतात सकारात्मक विचार केल्यामुळे आपले नैराश्य दूर होते व आपण प्रयत्न करण्यास तयार होतो,अशा विचारांमुळे आपल्यात ऊर्जा निर्माण होते.आपण जर सकारात्मक विचार केला तर ती गोष्ट क...

नातं

  माझ्या वाचक मित्रांनो!      नातं  किंवा नातेवाईक म्हटंल की ,आपल्या डोळ्यासमोर येतात आपले आईवडील,भाऊ-बहिण,पती-पत्नी,मुलं आणि इतर नातेवाईक. परंतु नातं फक्त रक्ताच्याच लोकांशी असतं का? तेच फक्त आपले नातेवाईक असतात का? नातं या शब्दाचा इतका संकुचित अर्थ आहे का? की आपण नातं या शब्दाची कक्षा कमी केली आहे??      खरंतर नातं हा खूप व्यापक अर्थाचा शब्द आहे.नातं या शब्दात सारं विश्व व्यापलेलं आहे.नातं म्हणजे प्रेम,आपुलकी,जिव्हाळा,स्नेह,माया,ममता आणि बरंच काही.घट्ट बंधन आणि आणि ऋणानुबंध म्हणजे नातं होय.ज्यांच्याविषयी आपल्या मनात आपुलकीची आणि विश्वासाची जागा असते तो आपला नातेवाईक असतो. त्यांच्याशीच आपलं नातं निर्माण होऊ शकतं.ज्याच्या संकटात पुढे आणि आनंदात मागे उभं राहावसं वाटतं त्या प्रत्येकाशी आपलं नातं असतं.         नातं हे कोणाशी ठरवून करता येत नाही.नातं कधी?कुठे?आणि केव्हा निर्माण होईल हेही सांगता येत नाही.परंतु एकदा नातं निर्माण झालं की ते आयुष्यभर टिकतं. खरं नातं शुल्लक कारणांवरून तुटू शकत नाही.नातं हे प्रसंगी फुलाहूनही कोमल पर...

राग व्यवस्थापन

        माझ्या वाचकमित्रांनो!              राग येणं स्वाभाविक गोष्ट आहे.परंतु राग कसा ? केव्हा ? व कुठे व्यक्त करावा याचं तंत्र माहिती असावं. रागाचं व्यवस्थापन करणं ज्याला जमतं त्यालाच जीवनात यश मिळतं.       योग्य वेळी,योग्य पद्धतीने व योग्य ठिकाणी राग व्यक्त करणं यालाच राग व्यवस्थापन असं म्हणतात. राग आल्यावर तो लगेच व्यक्त न करता, त्या प्रसंगावर विचार करावा.परिस्थिती समजून घ्यावी. व आपला राग योग्य वेळी,योग्य शब्दांत किंवा न बोलता कृतीतून राग व्यक्त करावा.       पडणाऱ्या पावसाचं पाणी लगेच वाहून गेलं तर त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही.ते पाणी वाया जातं. परंतु पावसाचं पाणी अडवलं,साठवलं तर त्या पाण्याचा योग्य उपयोग करता येतो. ते पाणी वाया जात नाही. रागाचंही अगदी तसंच आहे.राग आल्यावर तो लगेच व्यक्त न करता साठवला,थोपवला आणि परिस्थितीनुरूप व्यक्त केला किंवा त्या रागाचं सकारात्मक ऊर्जेत रूपांतर केलं तर राग हा देखील फलदायी ठरेल.      वाहणाऱ्या वार-याला अडथळा आला नाही तर वारा प्रचंड वेगाने ...

क्वालिटी टाईम.

            माझ्य वाचक मित्रांनो  !             सध्याच्या धकाधकीच्या युगात एक गोष्ट  महाग झाली आहे,ती म्हणजे वेळ ! लोकांना एकवेळेस इतरांना पैसे देणे सहजसोपं वाटतं परंतु वेळ देणं अवघड वाटतं.कुटुंबातील लोकसुद्धा एकमेकांना वेळ देऊ शकत नाही.प्रत्येकजण नोकरी- व्यवसायाच्या मागे धाव- धाव धावतोय.टीचभर पोटाच्या खळगीसाठी जीवन महाग झालंय. प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच वाक्य असतं.... मला वेळ नाही. वेळच मिळत नाही. अगदी स्वतःसाठी,स्वतःच्या आरोग्यासाठी आणि कुटूंबासाठीही.         मुलांसाठी पालकांना वेळ काढणं अवघड झालं आहे .मुलांना नक्की काय हवं असतं ? मुलांना जर उत्तम घडवायचं असेल,त्यांना अनुभवसमृद्ध बनवायचं असेल तर पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम देणं आवश्यक आहे. काही पालकांना वाटतं मुलांना खूप सारी खेळणी दिली,खूप खाऊ दिला,भारी-भारी ड्रेस दिले,शाळेची सर्व फी भरली,वह्या-पुसतकं दिली म्हणजे आपलं काम झालं.परंतु या साऱ्या गोष्टी आवश्यक आहेच. परंतु त्या सर्वांहूनही महत्त्वाचं आहे तो म्हणजे मुलांना वेळ देणं.मुलांना त...

एकविसी

                  शुक्रवार ,12 डिसेंबर  2003 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यालय शिरवळ,ता. खंडाळा,जि.सातारा येथे मी शिक्षक म्हणून रूजू झालो,आणि माझ्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली. शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षक म्हणून आज माझी 21 वर्षे पूर्ण झाली. आजही मला माझा  शाळेचा पहिला दिवस जसाच्या तसा आठवतो. 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मला माझा प्रत्येक दिवस पहिलाच आणि नवीनच  वाटतो. दररोज नवीन काहीतरी शिकावं आणि विद्यार्थ्यांना शिकवावं असं वाटतं. शिक्षक म्हणून घडविण्यात मला माझे आईवडील,आत्या- आणि मामा,माझे सर्व नातेवाईक आणि मला शिकवणारे सर्व शिक्षक,ज्या गुरूजन अध्यापक विद्यालय पाटण,जि. सातारा येथे मी शिक्षक म्हणून घडलो तेथील माझे सर्व गुरूजन,आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिकवता-शिकवता मीच शिक्षक म्हणून घडत होतो.ते माझे आदर्श विद्यालय व साधना विद्यालय हडपसर येथील विद्यार्थी,आतापर्यंत मला लाभलेले माझे सर्व मुख्याध्यापक आणि सहकारी यांचा मी ऋणी आहे. तुमच्या सर्वांमुळेच मी शिक्षक म्हणून घडलो.        मागे वळून पाहतान...

माणूसकी.

  माझ्या वाचकमित्रांनो!       "खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे ". मातृहदयी कवी साने गुरूजी सांगतात कोणालाही तुच्छ लेखू नये.कुणालाही हिणवू नये.आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत. सर्वांशी प्रेमाने वागावे. प्रेम द्यावे आणि घ्यावे. जगात ज्यांना कोणीही नाही त्यांना आधार द्यावा. दु:खी ,कष्टी लोकांना समजून घ्यावे. त्यांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करावा.      या जगात सर्वात सुंदर काय असेल तर ते माणसाने ,माणसाशी ,माणसासारखे वागणे.माणूसकीने वागणे. ज्याच्याकडे माणुसकी आहे ती व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत आणि सुंदर व्यक्ती असते. माणूसकी हा माणसाचा सर्वात सुंदर दागिना आहे.माणूसकी म्हणजे नक्की काय?"माणूसकी म्हणजे "मी" माणूस व बाकीचेही " माणूस  " हे समजून वागणे होय.माणसाने माणसाला समजून घेतले तर जगातील सर्व समस्या दूर होतील.कोणताही भेदभाव राहणार नाही.जो इतरांशी प्रेमाने,मायेने आणि माणूसकीने वागतो त्याच्याच हदयात परमेश्वराचे वास्तव्य असते.        परमेश्वर कुठे असतो. कवी कुसुमाग्रज " स्वातंत्र्यदेवीची विनवणी "या कवितेत म्हणतात, "पन्नाशीची...

राग

        माझ्या वाचक मित्रांनो!           काही परिस्थितीत आपला संयम सुटतो आणि राग अनावर होतो. राग येणं ही नैसर्गिक व स्वाभाविक गोष्ट आहे.परंतु राग नियंत्रित करणं ही प्रयत्नाने सहजसाध्य गोष्ट आहे.राग कधी आणि कुठे व्यक्त करावा? व राग कुठे व्यक्त करू नये ही मनाचा संयम पाहणारी गोष्ट आहे. राग म्हणजे एकप्रकारची त्रासिक स्थिती आहे. राग हा काही काळापुरताच टिकतो. हळूहळू तो कमी होतो. कालांतराने तो संपतोही. राग आल्यानंतर लगेच व्यक्त न होता काही काळ थांबले, काहीच कृती केली नाही तर राग नियंत्रित होतो. राग आल्यावर थांबणं हा एक रामबाण उपाय आहे.         रागाचा परिणाम आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्यापेक्षा आपल्यावरच जास्त होतो. आपण एखाद्या व्यक्तीवर रागावतो म्हणजे नेमकं काय? रागावणं हे त्या व्यक्तीवर नसतं तर ते त्या व्यक्तीच्या बोलण्यावर,वागण्यावर प्रासंगिक असतं. काही काळ आपण शांत राहिलो तर तीच व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते. म्हणजे राग हा क्षणिक आहे.          राग आल्यावर आपण ज्या काही गोष्टी करतो,खरंतर त्या विचार न...

पुस्तकांसाठी घर

      माझ्या वाचकमित्रांनो!       जगात काही लोक यशस्वी होतात तर काही अपयशी होतात...यशस्वी लोक वेगळं असं काही करत नाही,परंतु ते जे काही करतात तेच वेगळ्या प्रकारे करतात. हेच खरं यशाचं गमक आहे. जगात सर्वात श्रीमंत कोण असतो.... असं विचारल्यावर आपल्यासमोर अनेक नावं येतात. परंतु फक्त संपत्ती म्हणजे श्रीमंती नाही. तर ज्याच्याजवळ बुद्धीचं धन आहे तोच खरा श्रीमंत होय.पुस्तकप्रेमी मनुष्य जगातील सर्वात सुखी व श्रीमंत मनुष्य असतो. महापुरूषांचा जर आपण विचार केला तर ते जीवनात कमी व पुस्तकातच जास्त असतात. सदैव वाचन हेच त्यांच्या यशाचं गमक आहे.           माणूस राहण्यासाठी घर बांधतो. परंतु पुस्तकांसाठी घर बांधणे ही गोष्टच आपल्याला वेगळी वाटते. अविश्वसनीय वाटते. इतिहासाची पाने चाळताना आपण बऱ्याच गोष्टी नाविन्यपूर्ण व वेगळ्या पाहतो,अनुभवतो. 'जाॅर्ज पंपनच्या स्वागतासाठी भारतात- मुंबईत कोणीतरी 'गेट वे ऑफ इंडिया 'बांधले. शहाजहानने प्रिय पत्नी मुमताजमहल साठी 'जगप्रसिद्ध ताजमहाल' बांधला. अनेकांनी राजे- रजवाडे,शिशमहल बांधले. तर कोणी सुंदर मंदिरे बांधली. मुस्...

ज्ञानसूर्य

  ज्ञानसूर्य      अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत,परिस्थितीला न डगमगता,अस्पृश्यता,गरिबीला सामोरे जाऊन शिक्षणातील नेपोलियन म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे. अशा विश्वरत्न,ज्ञानसूर्य,भारतरत्न डाॅ.भिमराव रामजी आंबेडकर अर्थातच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व हे सदैव सर्वांना प्रेरणा देणारे व दिशादर्शक आहे.      डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्चशिक्षण मुंबई विद्यापीठ,अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ व इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स व जर्मनीतील बाॅन विद्यापीठ इथे पूर्ण केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हयातीत भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्चविद्याविभूषित व्यक्ती होते.भारतसरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 64 विषयांमध्ये तज्ज्ञ होते. त्यांच्या मुख्य पदव्या बी.ए.,दोनदा एम.ए.,पी.एच.डी.,एम.एस.सी.,बार अॅट लाॅ,डी.एस.सी. व एल.एल.डी आणि डी. लिट.,अशा होत्या.           जगात ज्ञानाचा गौरव होतो. पैसे,पद,प्रतिष्ठा अधिकार  या सर्वांपेक्षा ज्ञान,बुद्धीमत्ता नेहम...

कृष्ण व्हा..

            माझ्या बालमित्रांनो,आणि वाचकमित्रांनो!             अनेक जण जीवन जगताना जीवनाबद्दल,परिस्थितीबद्दल, व्यक्तींबद्दल,नातेवाईकांबद्दल अनेकदा तक्रारी करताना दिसतात.मला चांगले नातेवाईकच नाहीत,मला जास्त वेळच मिळत नाही. मला समाधानच मिळत नाही...काही-काही जण तर मला चांगलं घरंच मिळालं नाही अशीही तक्रार करतात. खरं तर प्रत्येकाकडेच अडचणी,तक्रारी,समस्या या असतातच. परंतु जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टीकोन असेल तर माणूस परिस्थिती आणि पर्यायाने सर्व कमी - अधिक गोष्टी स्वीकारतो. आहे त्या परिस्थितीत समाधान मानतो. आणि आनंदी राहतो.        जन्म आणि मृत्यू यांमधील अंतर म्हणजे जीवन होय.जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात. परंतु जीवन कसं जगायचं,परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे मात्र आपल्याच हाती असतं. आहे त्यात समाधान मानायचं की, नाही त्याचं दुःख करत बसायचं हे सर्वस्वी आपल्याच हाती असतं. जीवनाकडे कसं पाहावं हे सांगताना कवीश्रेष्ठ मंगेश पाडगांवकर एका कवितेत म्हणतात...  "सांगा कसं जगायचं, कण्...

नैतिकता

            आपण विचार करतो का ? प्रिय वाचक मित्र,माझे स्नेही आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मित्र-मैत्रिणींनो .......        आपण वेगवेगळ्या विषयांवर नेहमीच आपले मत ,आपल्या अपेक्षा, इतरांसमोर मांडत असतो. त्या पूर्ण कशा कराव्यात, किंवा आपणच आपल्या पूर्ण न होणाऱ्या अपेक्षांचे ओझे, आयुष्यभर कसे सांभाळतो ? याचाही आपण बऱ्याचदा विचार करतो. पण मला प्रामाणिकपणे असे वाटते की ,या सर्व अपेक्षा पूर्ण होण्यासाठी या- ना त्याप्रकारे आपल्या पालकांची किंवा जोडीदाराची आपल्याला खंबीर अशी साथ मिळते. पण यासाठी आपल्यासमोर एखादे ध्येय असायला हवे. खरंतर ध्येयवादी आणि ध्येयवेडे हे दोन शब्द प्रकर्षाने वेगळे दिसत असले, तरी ते आपल्या जीवनात मोलाचा वाटा उचलत असतात .आपल्यातील प्रामाणिकता, सामंजस्यता जशी महत्त्वाची असते, तसाच नैतिकता हा शब्द आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे.            नैतिकतेबद्दल  बोलायचे झाले ,तर खाजगीत बोलण्याचे, चालण्याचे ,सारे जीवनतरंग चारचौघात बोलले जातात. पण नको ते, नको त्या वयात ऐकल्यामुळे, पाहिल्यामुळे नै...

वाचाल तर वाचाल

  वाचाल तर वाचाल.            आपल्या सर्वांच्या कानीकपाळी सध्या एकच वाक्य कायम पडत असतं. ' अरे मुलांनो जरा वाचा रे ... घरी आई-वडील आणि शाळेत शिक्षक सारखेच सांगतात. मुलांनो खूप वाचन करा ..पुस्तके वाचा कादंबरी वाचा, वर्तमानपत्र वाचा, गोष्टी वाचा, वाचत रहा . मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो खरंच एवढं का वाचायचं? काय फायदा या वाचनाचा ? चला तर समजून घेऊया विषय चला वाचू आनंदे.      " दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे." समर्थ रामदास यांनी वरील शब्दात वाचनाचे महत्त्व सांगितले आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनाचे महत्त्व सांगताना म्हणतात, "वाचाल तर वाचाल ". तर फ्रान्सिस बेकन नावाचे इंग्रजी लेखक म्हणतात 'वाचन परिपूर्ण माणूस बनवते .वाचनामुळे उत्तम व्यक्तिमत्व घडते .वाचनामुळे माणूस सर्वज्ञानी होतो ,समृद्ध होतो. इतके सारे वाचनाचे महत्त्व आहे . एवढंच नाही तर पुस्तक प्रेमी मनुष्य जगातील सर्वात सुखी व श्रीमंत असतो , असेही म्हणतात.              वाचन हा एक अतिशय समृद्ध करणारा छंद मानला जातो. पु...