ज्ञानसूर्य

 ज्ञानसूर्य

     अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत,परिस्थितीला न डगमगता,अस्पृश्यता,गरिबीला सामोरे जाऊन शिक्षणातील नेपोलियन म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे. अशा विश्वरत्न,ज्ञानसूर्य,भारतरत्न डाॅ.भिमराव रामजी आंबेडकर अर्थातच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व हे सदैव सर्वांना प्रेरणा देणारे व दिशादर्शक आहे. 

    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्चशिक्षण मुंबई विद्यापीठ,अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ व इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स व जर्मनीतील बाॅन विद्यापीठ इथे पूर्ण केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हयातीत भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्चविद्याविभूषित व्यक्ती होते.भारतसरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 64 विषयांमध्ये तज्ज्ञ होते. त्यांच्या मुख्य पदव्या बी.ए.,दोनदा एम.ए.,पी.एच.डी.,एम.एस.सी.,बार अॅट लाॅ,डी.एस.सी. व एल.एल.डी आणि डी. लिट.,अशा होत्या. 

         जगात ज्ञानाचा गौरव होतो. पैसे,पद,प्रतिष्ठा अधिकार  या सर्वांपेक्षा ज्ञान,बुद्धीमत्ता नेहमीच श्रेष्ठ असते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेचा जगभर गौरव झाला. ते 1913 - 1916 या कालावधीत अमेरिकेतील कोलंबिया या विद्यापीठात शिकले. तिथे त्यांनी एम.ए.,पी.एच.डी. पूर्ण केली.साधारणपणे 2004 मध्ये या कोलंबिया विद्यापीठाला तीनशे वर्षे पूर्ण झाली. एखाद्या विद्यापीठाचं त्रीशतक होणं ही गौरवशाली बाब होती.या स्मृतिप्रित्यर्थ कोलंबिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी या विद्यापीठातून 300 वर्षांच्या कालावधीत शिक्षण घेऊन गेलेले व जगप्रसिद्ध झालेल्या 1000 विद्यार्थ्यांची यादी करण्याचे ठरवले.

खरंतर अशी यादी करणे अवघड होती.कारण या विद्यापीठातून 300 वर्षाच्या काळात अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती शिक्षण घेऊन गेले होते. आणि जगभर त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं होतं..

 यादी तयार झाली.पुढे त्यातून 100 व्यक्तींची यादी तयार केली. सरतेशेवटी कुलगुरूंनी या 100 विद्यार्थ्यांतून एकाच विद्यार्थ्याची निवड करण्याचे ठरवले.आणि अभिमानास्पद गोष्ट म्हणजे या कोलंबिया विद्यापीठातील 300 वर्षांच्या कालावधीतील आदर्श व जगप्रसिद्ध विद्यार्थी म्हणून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. आणि कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला. त्याचे अनावरण अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या शुभहस्ते झाले. पुतळ्याच्या खाली लिहिलेलं आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर  - The Symbol Of  Knlowlodge.

   म्हणजेच ज्ञानाचं प्रतिक  - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. 

केवढा मोठा हा गौरव होता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा.

      कोलंबिया विद्यापीठत शिक्षण घेतल्यानंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंडमधील लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स स्कूल येथे पुढील उच्चशिक्षण घेतले. याठिकाणी असणाऱ्या ग्रंथालयात बसून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचन करायचे. ते या वाचनालयात सर्वात अगोदर म्हणजेच ग्रंथालय सुरू होण्याची वेळ सकाळी 6 वाजताच जात.दिवसभर तिथे बसून विविध ग्रंथांचे वाचन करत.दुपारी जेवणासाठी थोडा वेळ उठत.ग्रंथालय सायंकाळी बंद होत असे.ग्रंथालयातून 

सर्वात शेवटी जाणारे सुद्धा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हेच असत.राहण्याच्या ठिकाणी गेल्यावरही मध्यरात्रीपर्यंत ते वाचन,अभ्यास करत. खाणे,आराम करणे,मनोरंजन,झोप अशा गोष्टींसाठी त्यांच्याकडे खूपच कमी वेळ असे.दिवसातील 18 ते 21 तास ते अभ्यास करत.इंग्लंडमधील शिक्षणासाठी 8 वर्षे इतका कालावधी लागणार होता. परंतु त्यांच्याकडे एवढा वेळ व आर्थिक बळही नव्हते. म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हा अभ्यासक्रम केवळ 2 वर्षे व 3 महिन्यातच पूर्ण केला. 

       इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्याच्या निमित्ताने लंडन मधील या विद्यापीठात अनेक जगप्रसिद्ध व्यक्ती शिकून गेल्या होत्या.या ग्रंथालयाची स्थापना 1850 रोजी झाली.अनेक व्यक्तींनी या ग्रंथालयात बसून वाचन केले होते.जवळपास 27 देशांचे राष्ट्राध्यक्ष,22 नोबल पुरस्कार विजेते, साहित्यिक,विचारवंत,लेखक,कवी,शास्त्रज्ञ,कार्ल,मार्क्स,लेनिन,माओ अशा अनेक लोकांनी याच ग्रंथालयात बसून वाचन केले होते. या लंडनमधील ग्रंथालयात थोर विचारवंत हरी नरके यांच्या मते 1 करोड 6 लाख एवढी पुस्तके आहेत. लंडनमधील याच सुप्रसिद्ध ग्रंथालयातील प्रसिद्ध अशा 1000 वाचकांची यादी करायचं ठरवलं. आणि देशाला अभिमान वाटावा अशी इतिहासात नोंद झाली. या 1000 वाचकात आदर्श वाचक म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रथम क्रमांकावर नाव आहे.

        खरोखरच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानसूर्य आहेत. अथक परिश्रम,जिद्द,वाचनाची आवड,या बळावर ते विश्वरत्न ठरले. पद ,पैसे,संपत्ती,प्रतिष्ठा यापेक्षा ज्ञान व बुद्धी याचा निश्चितच गौरव होतो हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातून निदर्शनास येते. 

        या ज्ञानसूर्यास विनम्र अभिवादन 🙏

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्वालिटी टाईम.

पुस्तकांसाठी घर

राग व्यवस्थापन