सकारात्मक विचार..
माझ्या वाचक मित्रांनो! ज्याप्रमाणे अस्वच्छ परिसर आणि अस्वच्छ वातावरणामुळे आपल्या शरीरावर परीणाम होतो. आपण आजारी पडतो, आपले शारीरिक स्वास्थ्य बिघडते. त्याप्रमाणे नकारात्मक विचार व नकारात्मक विचार करणारे लोक यांच्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते. आपण मनाने व विचाराने आजारी पडू शकतो. आजारी पडू नये म्हणून आपण स्वच्छ वातावरणात राहण्याचा व स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतो.तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी सकारात्मक विचार व सभोवताली सकारात्मक वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते. जीवनात सकारात्मक विचार अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण सकारात्मक विचार केला तर घडणाऱ्या गोष्टीही चांगल्या घडतात. आपण जर नकारात्मक विचार केला तर घडणाऱ्या घटनाही वाईटच असतात.सकारात्मक विचार आपला जीवनदृष्टीकोन बदलतो.सकारात्मक विचार ही एक मानसिक व भावनिक वृत्ती आहे.सकारात्मक विचारांमुळे अनुकूल बदल घडतात सकारात्मक विचार केल्यामुळे आपले नैराश्य दूर होते व आपण प्रयत्न करण्यास तयार होतो,अशा विचारांमुळे आपल्यात ऊर्जा निर्माण होते.आपण जर सकारात्मक विचार केला तर ती गोष्ट क...