राग
माझ्या वाचक मित्रांनो! काही परिस्थितीत आपला संयम सुटतो आणि राग अनावर होतो. राग येणं ही नैसर्गिक व स्वाभाविक गोष्ट आहे.परंतु राग नियंत्रित करणं ही प्रयत्नाने सहजसाध्य गोष्ट आहे.राग कधी आणि कुठे व्यक्त करावा? व राग कुठे व्यक्त करू नये ही मनाचा संयम पाहणारी गोष्ट आहे. राग म्हणजे एकप्रकारची त्रासिक स्थिती आहे. राग हा काही काळापुरताच टिकतो. हळूहळू तो कमी होतो. कालांतराने तो संपतोही. राग आल्यानंतर लगेच व्यक्त न होता काही काळ थांबले, काहीच कृती केली नाही तर राग नियंत्रित होतो. राग आल्यावर थांबणं हा एक रामबाण उपाय आहे. रागाचा परिणाम आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्यापेक्षा आपल्यावरच जास्त होतो. आपण एखाद्या व्यक्तीवर रागावतो म्हणजे नेमकं काय? रागावणं हे त्या व्यक्तीवर नसतं तर ते त्या व्यक्तीच्या बोलण्यावर,वागण्यावर प्रासंगिक असतं. काही काळ आपण शांत राहिलो तर तीच व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते. म्हणजे राग हा क्षणिक आहे. राग आल्यावर आपण ज्या काही गोष्टी करतो,खरंतर त्या विचार न...