नैतिकता
आपण विचार करतो का ? प्रिय वाचक मित्र,माझे स्नेही आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मित्र-मैत्रिणींनो ....... आपण वेगवेगळ्या विषयांवर नेहमीच आपले मत ,आपल्या अपेक्षा, इतरांसमोर मांडत असतो. त्या पूर्ण कशा कराव्यात, किंवा आपणच आपल्या पूर्ण न होणाऱ्या अपेक्षांचे ओझे, आयुष्यभर कसे सांभाळतो ? याचाही आपण बऱ्याचदा विचार करतो. पण मला प्रामाणिकपणे असे वाटते की ,या सर्व अपेक्षा पूर्ण होण्यासाठी या- ना त्याप्रकारे आपल्या पालकांची किंवा जोडीदाराची आपल्याला खंबीर अशी साथ मिळते. पण यासाठी आपल्यासमोर एखादे ध्येय असायला हवे. खरंतर ध्येयवादी आणि ध्येयवेडे हे दोन शब्द प्रकर्षाने वेगळे दिसत असले, तरी ते आपल्या जीवनात मोलाचा वाटा उचलत असतात .आपल्यातील प्रामाणिकता, सामंजस्यता जशी महत्त्वाची असते, तसाच नैतिकता हा शब्द आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. नैतिकतेबद्दल बोलायचे झाले ,तर खाजगीत बोलण्याचे, चालण्याचे ,सारे जीवनतरंग चारचौघात बोलले जातात. पण नको ते, नको त्या वयात ऐकल्यामुळे, पाहिल्यामुळे नै...