पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक भाकर तीन चुली...

          पारूबाई या अनाथांची माय सिंधुताई सपकाळच आहेत की काय असाच क्षणभर भास होतो ही कादंबरी वाचताना...         भरउन्हात खळ्यावर जन्माला आलेली अभागी पारूबाई आणि रात्रीच्या काळोखात चिमणीचा  उजेडही सोबतीला नसताना जन्माला आलेला बबू यांचा जीवनपट मनाला स्पर्शून जातो.आणि मनात घर करतो.          जन्म जिथे झाला ते खळं आणि आयुष्यभर कामं केलेली शेतं, नाला - बंडिगची कामं,ताली,रानं,यांनी पारूबाईची साथ कधी सोडलीच नाही. जीवनातील सर्व संकंट,रागराग,द्वेष,गरीबी,दुबळवाडी, भाऊबंदकी,पुरूषांच्या वखवखलेल्या नजरा,सासू - नणंदाचा छळ सहन करूनही पारूबाई कधीही जीवनाला वैतागत नाहीत.  संकटांना पायाखाली घेऊन  ,संकटाच्या छाताडावर उभं राहून पारूबाई स्वाभिमानानं जगतच राहातात. जीवनात हारत नाही. संकटांनी कधीही गर्भगळित होत नाहीत. ही कादंबरी वाचणारा वाचक जीवनातील संकटांना कधीच घाबरणार नाही. त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार कधीही येणार नाही. स्वाभिमानाने  जीवन जगण्याची प्रत्येकात ओढ निर्माण होईन.         ...

असे शिक्षक होणे नाही..

  पाबळच्या ज्ञानपंढरीचे  - पांडूरंग- दैवत.                   ज्यांनी आम्हांला घडवलं त्या श्री. भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ या शाळेतील अनेक गुरूजनांपैकी एक असणारे ,आमच्या शाळेचे माजी प्राचार्य मा.गाडीलकर सर .          आदरणीय गाडीलकर सर आणि त्या काळातील आमच्या शाळेतील शिक्षक हे केवळ शाळेपुरते शिक्षक नव्हते, तर  तेव्हाचे शिक्षक हे संपूर्ण गावाचे शिक्षक असायचे.गाडीलकर सर हे सुद्धा त्यातलेच एक. आमच्या श्री.भैरवनाथ विद्यामंदिर पाबळच्या ज्ञानपंढरीचे ते पांडूरंगच.        गाडीलकर सर हे आमच्या दोन पिढ्यांचे शिक्षक...माझ्या वडिलांना,आत्या व चुलते यांनाही ते शिकवायला होते. मी आणि माझ्या भावंडानाही ते शिकवायला होते. सरांच्या बाबतीत आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे सरांचा दरारा आणि शिस्त. पाबळची संपूर्ण शाळा जर कोणाला घाबरत असेल तर ती गाडीलकर सरांनाच. गाडीलकर सर हे नाव उच्चारताच किंवा त्यांना लांबून पाहिले तरी पोटात भितीचा गोळा यायचा. इतके सर कडक शिस्तीचे होते. केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांतही सरांच...