गंधर्व आणि गंधर्वलोक.
नमस्कार वाचक मित्रहो. सर्वप्रथम आज आपण देवादिकांचे मनोरंजन करणारे गंधर्व आणि गंधर्वलोक याविषयी माहिती घेणार आहोत. गंधर्व म्हटंल आपल्याला कुतुहल वाटतं. गंधर्व म्हटंल की आपल्या डोळ्यासमोर येतात ते कलाकार. आणि लोकमान्य टिळक यांनी नारायण श्रीपाद राजहंस यांना म्हटंलेलं वाक्य आठवतं. "अरे हे तर बालगंधर्व. गंधर्वांना अर्धदेव असेही म्हणतात. त्यांना देवांपैकी निम्नपदाचा दर्जा होता.गंधर्व ही एक व्यक्ती नसून ती एक जमात किंवा समूह होता. देवादिकांचे मनोरंजन करणारे कलाकार म्हणजेच गंधर्व होय. दक्षिण भारतात गंधर्वांची पूजा करतात. विद्येची देवता सरस्वती विणा वाजवताना गंधर्व या कलाकार समूहांचा जन्म झाला असं मानतात. गंधर्व जमातीचे,समूहचे अंतरिक्षात वास्तव्य असते असं मानलं जायचं. त्यांच्या वास्तव्य ठिकाणाला गंधर्वलोक असं म्हणतात. स्वर्गात देवांच्या अनेक प्रजाती राहत होत्या.प्रजाती म्हणजेच प्रकार असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. तेहतीस कोटी देव ही संकल्पना आपल्याकडे आहे. त्यापैकी गंधर्वांना अर्धदेव किंवा उपदेवांचा दर्जा होता. स्...