चूक नव्हे,शिक्षण..
माझ्या वाचकमित्रांनो! " चुका आणि शिका " ही अनुभवपद्धती आपण नेहमीच ऐकतो. चुका होत नाही असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही.चुका या काम करणार-यांकडूनच होतात. काही माणसं चुकांकडे दुर्लक्ष करतात.तर काही माणसं चुकांमधून शिकतात. चुकतो तो माणूस. आणि चुकांमधून शिकतो तो शहाणा माणूस. चूक करणं हा मानवी गुणधर्म आहे.आणि झालेली चूक सुधारणे हे चांगला माणूस असण्याचं लक्षण आहे.झालेली चूक मान्य केली किंवा स्वीकारली की ती सुधारता येते.परंतु काही माणसं चुका स्वीकारत नाहीत. मी चुकू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीत. किंवा काहींना चुका स्वीकारण्याचा कमीपणा वाटतो. आणि अशी माणसं कधीही सुधारू शकत नाहीत. म्हणून चूक झाली तर मोठ्या मनाने चूक मान्य करा व सुधारणा करा. बरेच जण चूक होऊ नये म्हणून कोणतंही काम करत नाहीत. काम टाळतात. आणि त्यामुळे चुकाच होत नाही. परंतु काम न करणाऱ्या माणसांना कोणताही अनुभव येत नाही. ते निष्क्रिय राहतात. याउलट काम करणारी माणसं चुकतात आणि अनुभवाने शहाणी होतात. चुकांमधून सुधारणा करतात. व ...